शनिवार, २१ जानेवारी, २०२३

प्रदूषण एक समस्या

      आजचे युग हे विज्ञान युग आहे. जसे विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत होत आहे तसतसे त्याचे दुष्परिणाम देखील वाढत आहे. प्रदूषण हा असाच एक तंत्रज्ञानाचा एक दुष्परिणाम आहे. आज दुष्परिणाम एक समस्या बनवलेली आहे. प्रदूषण हे निसर्गाला लागलेली सर्वात मोठी कीड आहे आज मोठ्या प्रमाणावर निसर्गाचा हॉर्स होत आहे त्याला कारणीभूत म्हणजे प्रदूषण आहे. अतिशय सुंदर निसर्ग आज या प्रदूषण रूपी आज आजाराने जडलेला आहे. हवेत पाण्यात वातावरणात असे काही घटक स्थिरावतात की ज्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते व प्रदूषण होते.                                  जग जसे जसे प्रगती करत आहे त्यामुळे आपला जसा फायदा होतो आहे तसेच काही आपलं नुकसान होत आहे त्यामुळे ज्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे त्यापैकी एक समस्या म्हणजे प्रदूषण आहे प्रदूषण हे अनेक प्रकारच्या असतात. वायु प्रदूषण ,जल प्रदूषण ,ध्वनी प्रदूषण आणि माती प्रदूषण इत्यादीचा समावेश होतो वातावरणातील पाण्यात हवेत मातीत सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण असे म्हणतात. वायु प्रदूषण हे वाहना मधून निघणारा धूर कारखान्यातून निघणारी विषारी वायूउडणारी धूळ इत्यादी कारणामुळे होतो. हे दूषित वायू वातावरणात मिसळतात. अनेक आरोग्य समस्या होऊ शकतात. तसेच पर्यावरणाची हानी होऊ शकते जलप्रदूषण सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली समस्या आहे कारखान्यातील रासायनिक कचरा दूषित पाणी गटारातील पाणी नदीत सोडले जाते पाण्यातील दूषित पदार्थ नदी तलाव इत्यादी जलाशयात प्रवेश करतात व ते दूषित पाण्यात ते पदार्थ विरघळतात व ते पाणी अशुद्ध होते वाहनाचे हॉर्न ट्रेन विमान दूरदर्शन लाऊड स्पीकर मधून निघणारा आवाज ध्वनी प्रदूषण वाढवत असतात 90 डेसिबल पेक्षा जास्त जोराच्या आवाजामुळे बहिरेपणा येतो व रक्तवाहिन्या संकुचित होतात प्रकारे माणूस बऱ्याच मानसिक आणि शारीरिक आजाराला बळी पडतो. रासायनिक कचरा दूषित पाणी जमिनीत मिसळून सुद्धा प्रदूषण होत आहे प्रदूषण कोणत्याही प्रकारचे असो ते मनुष्य जीवनासाठी धोकादायकच असते सोबत प्राणी व वनस्पती त्यांच्यासाठी ही तीन घातकच आहे प्रदूषणावर मात करण्यासाठी काही मूलभूत उपाययोजना करू शकतो सार्वजनिक विहिरी पाण्याच्या साठ्याजवळ केर कचरा टाकू नये . कारखान्यांना लोक वस्ती पासून दूर ठेवले पाहिजे आणि त्यापासून निघणाऱ्या दूषित घटकांना नष्ट करण्याचा मार्गाचा विचार केला  पाहिजे. वाहनाचा वापर मर्यादित प्रमाणात केला पाहिजे रबर टायर, प्लास्टिक अशा हानिकारक वस्तू जाळू नयेत जास्तीत जास्त प्रमाणात झाडे लावावीत. वाहनांमधील हॉर्नचा आवाज पातळी कमी करावी रासायनिक खताच्या ऐवजी जैविक खताचा वापर करावा पॉलीथीनच्या ऐवजी कागदाचा वापर करावा. असे काही मूलभूत अमलात आणल्यास प्रदूषणावर थोड्या प्रमाणात मात करता येतो प्रदूषण रोखण्यात आणि कमी करण्यात आज प्रत्येकाने भाग घेतला पाहिजे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे हे कर्तव्य पूर्ण केल्यानंतर पण पुढच्या पिढीला प्रदूषण मुक्त वातावरण देऊ शकतो

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ