रविवार, ३० एप्रिल, २०२३

अलंकारिक शब्द








  1. अष्टपैलू - सर्व गुण संपन्न
  2. अकलेचा कांदा - मूर्ख
  3.  उंबराचे फुल - दुर्मिळ वस्तू
  4. अकलेचा खंदक - अत्यंत मूर्ख माणूस
  5. अकरावा रुद्र - अतिशय तापट माणूस
  6. ओनामा - सुरुवात
  7. कळवा वरचे पाणी - फार काळ टिकणारे
  8. उंटावरचा शहाणा - मूर्खपणाचा सल्ला देणारा
  9. कळसुत्री बाहुली - दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
  10. कोल्हे कोई - शूद्र लोकांची बडबड
  11. काडी पहिलवान - हाडकुळा
  12. कुंभकर्ण - अतिशय झोपाळू
  13. कळीचा नारद - कळ लावणारा
  14. कुप मंडूक - संकुचित वृत्तीचा
  15. खुशाल चेंडू - चैनी खोर माणूस
  16. गर्भ श्रीमंत - जन्मापासून श्रीमंत 
  17. गंडांतर - भीतीदायक संकट
  18. गाजर पारखी - कसलाही पारख नसलेला
  19.  गुरुकिल्ली - मर्म, रहस्य
  20. गंगा यमुना - अश्रू
  21. घोरपड - चिकाटी धरणारा
  22. घर कोंबडा - घराबाहेर न पडणारा
  23. चर्पटपंजरी - निरर्थक बडबड
  24. चौदावे रत्न - मार
  25. छातीचा आकडा - शत्रुत्व
  26. टोळभैरव - कामात नासाडी करणारे लोक
  27. गोगलगाय - गरीब निरुपद्रवी मनुष्य
  28. ताटाखालचे मांजर - दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा
  29. त्रिशंकू - धड ना इकडे धडणा तिकडे
  30. दगडावरची रेघ - कधीही न बदलणारे
  31. दळुबाई - भिकड मनुष्य
  32. पांढरा परीस - लबाड 
  33. पोपटपंची - अर्थ नकळता पाठांतर करणारा
  34. मायेचा पूत - पराक्रमी मनुष्य
  35. पिकले पान - म्हातारा
  36. मंथरा - दृष्ट स्त्री
  37. बोके संन्यासी - ढोंगी मनुष्य
  38. बोलाचीच कडी - केवळ शाब्दिक वचने
  39. भीष्मप्रतिज्ञा - कठीण प्रतिज्ञा
  40. बिन भाड्याचे घर - तुरुंग
  41. मेष पात्र - बावळट
  42. लंकेची पार्वती - अत्यंत गरीब स्त्री
  43. लंबकर्ण - बेअकली
  44. वाहतीगंगा - आलेली संधी
  45. श्री गणेशा - प्रारंभ
  46. वाटण्याच्या अक्षता - नकार
  47. वामन मूर्ती - डेंगू किंवा बुटका माणूस
  48. स्मशान वैराग्य - तत्कालीक वैराग्य
  49. सांबाचा अवतार - अत्यंत भोळा माणूस
  50. सुळावरची पोळी - जीव धोक्यात घालणारे काम
  51. सूर्यवंशी - उशिरा उठणारा
  52. रामबाण - अचूक गुणकारी
  53. लंकेची पार्वती - अंगावर एकही दागिना ठेवला नाही
  54. आडेल तट्टू - अतिशय हट्ट करणारा
  55. मारुतीचे शेपूट - लांब जाणारे काम
  56. सव्यसाची - उलट सुलट काम करणारा
  57. बोलायचीच कडी - केवळ शाब्दिक वचने
  58. उंबराचे फुल - अगदी दुर्मिळ वस्तू
  59. जय चंदिवृत्ती - द्रोही किंवा फितूर वृत्ती
  60. घाशीराम कोतवाल - अन्यायी माणूस
  61. घटोत्कच - कपटी व्यक्ती
  62. चतुर संबाजी - मूर्ख मनुष्य
  63. शेंदार शिपाई - भित्रा माणूस
  64. शेंडेफळ - शेवटचे बाळ
  65. खोगीर भरती - निरुपयोगी लोकांचा भरणा
  66. हंडा पळी - वीजोड जोडपे
  67. सरकारी पाहुणा - तुरुंगातील कैदी
  68. शंभू - धडधाकट पण निर्बुद्ध व्यक्ती
  69. झारीतील शुक्राचार्य - आपले आहेत चिंतनारी जवळची व्यक्ती
  70. शिराळ शेट्टी ऐश्वर्य - क्षणभंगुर ऐश्वर्या
  71. गळ्यातील ताईत - अतिशय प्रिय व्यक्ती
  72. मदनाचा पुतळा - अतिशय देखणा पुरुष
  73. मायासुरी प्रकार - नाटकी किंवा ढोंगी प्रकार
  74. पांढरा परीस - लबाड मनुष्य
  75. भोजन भाऊ - बिनकामी व एत खाऊ लोक
  76. पांढरा कावळा - निसर्गात किंवा अस्तित्वात नसलेले गोष्ट
  77. भोळा सांब - साधा भोळा माणूस
  78. होय बा - स्वतःचे बुद्धी न चालवता दुसऱ्याच्या मताचे समर्थन करणारा
  79. रडतराव - भीतीमुळे प्रत्येक गोष्टीला नकार देणारी व्यक्ती
  80. भगीरथ प्रयत्न - अतिशय पराकोटीचा प्रयत्न
  81. बावन कशी - सर्वोत्कृष्ट व्यक्ती किंवा वस्तू
  82. दुर्योधन हट्ट - दुराग्रही हट्ट
  83. बाळकडू - लहानपणापासून लागलेले वळण
  84. दीड शहाणा - अतिशय विचित्र सल्ला देणारा
  85. दुर्वास - शीघ्रकोपी मनुष्य
  86. बकासुर - खादाड व्यक्ती
  87. जरत्कारू - अशक्त माणूस
  88. गुळाचा गणपती - अतिशय मंद असणारा
  89. बिवलकरी किता - अक्षराचे नमुनेदार वळण
  90. जमदग्नी - सहज रागात येणारे व्यक्ती
  91. नंदीबैल - दुसऱ्याच्या किंवा बायकोच्या मर्जीने वागणारा व्यक्ती
  92. नरसिंह - उग्र व पराक्रमी मनुष्य
  93. पुतना - दिसायला प्रेमळ पण वास्तविक पाहता कुटील स्त्री 
  94. ताकापुरते रामायण - आपले काम साधून घेण्यासाठी केलेली खुशामत
  95. तुकाराम बुवा - भोळा किंवा भाविक माणूस
  96. जड भरत - आळशी किंवा सुस्त
  97. धन्वंतरी - कुशल वैद्य किंवा डॉक्टर
  98. आडवा वरचे पाणी - फार काळ न टिकणारे
  99.  नवकोट नारायण - संपत्ती लाभलेला मनुष्य
  100. परसातील भाजी - केव्हाही व सहज प्राप्त होणारी गोष्ट

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

एक वचन अनेक वचन मराठी | Ekvachan Anekvachan Marathi

    एक वचन अनेक वचन मराठी | Ekvachan Anekvachan Marathi

        आपल्या आवती भोवती असणार्‍या व्यक्ती किंवा भौतिक वस्तु ज्या आपल्याला दिसतात किंवा असतात त्यांच्या वरुण जो आपल्याला बोध होतो त्याला वचन असे म्हणतात. म्हणजेच नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु किंवा व्यक्ती एक आहेत की अनेक आहेत याचा बोध ज्याच्यावरून होतो त्याला वचन असे म्हणतात.

    एक वचन अनेक वचन मराठी | Ekvachan Anekvachan Marathi
    एक वचन अनेक वचन मराठी | Ekvachan Anekvachan Marathi
      
    वचनाचे मराठीमधून दोन प्रकार पडतात
    1) एक वचन :- एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा नामावरून बोध झाल्यास त्याला एकवचन असे म्हणतात.
    उदा.:- घर, मुलगा, माणूस, सायकल, मोर इत्यादि.  

    2) अनेक वचन :- वस्तु किंवा व्यक्ती एक आहेत की अनेक हे नामाच्या रूपवरुन जेंव्हा समजते तेंव्हा त्यास अनेक वचन असे म्हंटले जाते. 
    उदा:- घरे,  मुले, माणसे  इत्यादि. 

    एक वचन अनेक वचन मराठी | Ekvachan Anekvachan Marathi


    1. आंबा - आंबे
    2. वासरू - वासरे
    3. पाखरू - पाखरे
    4. बटाटा - बटाटे 
    5. झाड - झाडे
    6. पान - पाने
    7. काम - कामे
    8. महिना - महिने
    9. पाटी - पाट्या
    10. खेडे - खेडी
    11. गाव - गावे
    12. घरटे - घरटी
    13. पुस्तक - पुस्तके
    14. पडदा - पडदे
    15. फळ - फळे
    16. रस्ता - रस्ते
    17. काच - काचा
    18. काटा - काटे
    19. खून - खुना
    20. खुर्ची - खुर्च्या
    21. घोडा - घोडे
    22. चांदणी - चांदण्या
    23. मुलं - मुले
    24. कांदा - कांदे
    25. मासा - मासे
    26. मेवा - मेवे
    27. गोष्ट - गोष्टी
    28. पाटी - पाट्या
    29. पिशवी - पिशव्या
    30. रोप - रोपे
    31. बादली - बादल्या
    32. केळ - केळ्या
    33. पैसा - पैसे
    34. गाय - गाई
    35. भांडे - भांडी
    36. तबला - तबले
    37. पोळी - पोळ्या
    38. विमान - विमान
    39. मुलगी - मुली
    40. कळी - कळ्या
    41. ससा - ससे
    42. भुंगा - भुंगे
    43. बाग - बागा
    44. चित्र - चित्रे
    45. पाखरू - पाखरे
    46. कावळा - कावळे
    47. चमचा - चमचे
    48. गोधडी - गोधड्या
    49. बोट - बोटे
    50. घर - घरे
    51. पाटी - पाट्या
    52. चूल - चुली
    53. पणती - पणत्या
    54. बी - बिया
    55. नदी - नद्या
    56. कुंडी - कुंड्या
    57.  इमारत - इमारती
    58. दुकान - दुकाने
    59. चिमणी - चिमण्या
    60. वेल - वेली
    61. फांदी - फांद्या
    62. किल्ली - किल्ल्या
    63. भांडे - भांडी
    64. आठवण - आठवणी
    65. किमान - किमानी
    66. किंमत - किमती
    67. गवळण - गवळणी
    68. चेहरा - चेहरे
    69. खिसा - खिसे
    70. गोडा - गोंडे
    71. राजा - राजे
    72. चित्र - चित्रे
    73. पाकळी - पाकळ्या
    74. झोका - झोके
    75. शेळी - शेळ्या
    76. दरी - दर्या
    77. विहीर - विहिरी
    78. माळ - माळा
    79. पायरी - पायऱ्या
    80. ताट - ताट
    81. ढेकूळ - ढेकळे
    82. दाणा - दाणे
    83. पुस्तक - पुस्तके
    84. चित्र - चित्रे
    85. चमचा - चमचे
    86.  टाळी - टाळ्या
    87.  फुलपाखरू - फुलपाखरे
    88.  दोरा - दोरे
    89. गोष्ट - गोष्टी
    90. पीस - पिसे
    91. गोळी - गोळ्या
    92. वाटी - वाट्या
    93. ताट - ताटे
    94. गुन्हा - गुन्हे
    95. जिल्हा - जिल्हे
    96. पेटी - पेट्या
    97. फळ - फळे
    98. खांदा - खांदे
    99. इमारत - इमारती
    100. मूळ - मुळे
    101. शहर - शहरे
    102. झुला - झुले
    103. रान - राने
    104. वन - वने
    105. मिनिट - मिनिटे
    106. जमीन - जमिनी
    107. बक्षीस - बक्षीसे
    108. साडी - साड्या
    109. हाक - हाका
    110. पाऊल - पाऊले
    111. कबूतर - कबुतरे
    112. फौज - फौजा
    113. पैसा - पैसे
    114. औषध - औषधे
    115. पेन - पेना
    116. पोळी - पोळ्या
    117. वही - वह्या
    118. डोळा - डोळे
    119. दरवाजा - दरवाजे
    120. दवाखाना - दवाखाने
    121. भाकरी - भाकऱ्या
    122. कुत्रा - कुत्रे
    123. टोपली - टोपले
    124. बोट - बोटे
    125. हरीन - हरीने
    126. पोट - पोटे
    127.  झेंडा - झेंडे
    128. बंगला - बंगले
    129. लिंबू - लिंबे
    130. छप्पर - छपरे
    131. शीत - शीते
    132. डोके - डोके
    133. देऊळ - देवळे
    134. तारीख - तारखा
    135. खारीक - खारका
    136. पोरगी - पोरी
    137. जाऊ - जावा
    138. तार - तारा
    139. नदी - नद्या
    140. भिंत - भिंती
    141. धार - धारा
    142. भुवई - भुवया
    143. लढाई - लढाया
    144. बाई - बाया
    145. सुई - सुया
    146. चटई - चटया
    147. नथ - नथी
    148. जीभ - जिभा
    149. बी - बिया
    150. वाडी - वाड्या
    151. रक्कम - रकमा
    152. वीट - विटा
    153. शीग - शिगा
    154. चूल - चुली
    155. जळू - जळवा
    156. पीसु - पिसवा
    157. सासू - सासवा
    158. चूक - चुका
    159. गळू - गळवे
    160. कुळ - कुळे
    161. छप्पर - छपरे
    162. डुक्कर - डुकरे
    163. मत - मते
    164. हरीण - हरणे
    165. लिंबू - लिंबे
    166. शीड - शिडे
    167. शीत - शिते
    168. कोकरू - कोकरे
    169. लेकरू - लेकरे
    170. लाकूड - लाकडे
    171. दार - दारे
    172. फुल - फुले
    173. चप्पल - चपला
    174. भाकरी - भाकऱ्या
    175. लढाई - लढाया
    176. बहिण - बहिणी
    177. थप्पड - थापडा
    178. पंगत - पंगती
    179. वरात - वराती
    180. जट - जटा
    181. खाट - खाटा
    182. कोल्हा - कोल्हे
    183. होडी - होड्या
    184. सोय - सोयी
    185. निवडणूक - निवडणुका
    186. सुई - सुया
    187. स्त्री - स्त्रिया
    188. मिरवणूक - मिरवणुका
    189. गंमत - गमती
    190. पंगत - पंगती
    191. नक्कल - नकला
    192. खाडी - खाड्या
    193. किंमत - किमती
    194. गाणे - गाणी
    195. मडके - मडकी
    196. लेकरू - लेकरे
    197. मूळ - मुळे
    198. साल - साली
    199. चादर - चादरी
    200. उद्यान - उद्याने

     

    लेबल:

    शनिवार, १ एप्रिल, २०२३

    मराठी वाक्यप्रचार व अर्थ | vakyaprachar in marathi with meaning

    • वाक्यप्रचार | vakyaprachar in marathi with meaning
    • मराठी वाक्यप्रचार व अर्थ  | vakyaprachar in marathi with meaning
      मराठी वाक्यप्रचार व अर्थ  | vakyaprachar in marathi with meaning 
            वाक्यप्रचार | vakyaprachar in marathi with meaning
    •   या आपल्या लेखामधून आपल्या रोजच्या जिवनात .वापरले जाणारे वाक्याप्रचार व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. आपली बोली भाषा,आपले शरीर,आपले रोजचे वागणे-बोलणे यावर अनेक प्रकारचे वाक्य प्रचार निर्माण झाले आहेत. वाक्यप्रचाराचा शब्दशहा अर्थ हा वेगळं असतो परंतु त्यापासून एक वेगळा अर्थपूर्ण अर्थ तयार होतो. असे काही वाक्यप्रचार व त्याचे अर्थ खाली दिलेले आहेत ते आपल्याला नक्कीचवाक्यप्रचार|vakyaprachar in marathi with meaning  आवडतील अशी अशा आहे.   "वाक्यप्रचार | vakyaprachar in marathi with meaning" खलील प्रमाणे पाहुयात  

    • अंग चोरने - फारच थोडे काम करणे 
    • अंगात विज संचारणे - अचानक अंगात सर्व शक्ती सामावणे
    • कपाळ फुटणे- दुर्दैव ओढवण
    • उर भरून येणे- मन दाटून येण
    • कपाळ मोक्ष होणे- मृत्यू होण
    • कंठाशी प्राणी येणे- खूप कासावी होण
    • कंबर खचणे - धीर सुटण
    • कान उघडणे करणे- झालेल्या चुकाबद्दल स्पष्ट बोलणे
    • कान टोचणे- चूक लक्षात आणून देणे
    • कान पेरणी- अद्दल घडव
    • गळ्यात ताईत होणे- अतिशय आवडता होने
    • कानावर घालने- लक्षात आणून देणे
    • कंठ दाटून येणे - गहिवरून येणे
    • कान उपटणे - कडक शब्दात समज देणे
    • गळा काढणे - मोठ्याने रडणे
    • जीव की प्राण असणे - खूप आवडले
    • डोक्यावर खापर फोडणे -  कुठलेही कारण नसताना दोष ठेवणे
    • डोळ्याचे पारणे फिटणे - समाधान होणे
    • जीप साईल सोडणे - वाटेल ते बोलणे
    • डोक्यावर बसवणे - फालतू विनाकारण लाड करणे
    • जिभेला हाड नसणे - वाटेल ते बोलणे
    • डोळ्यात धुळ फेकणे - खोटे-नाटे बोलून फसवणे
    • छाती दडपणे - घाबरून जाणे
    • डोके फिरणे - राग येणे
    • खांद्याला खांदा भिडवणे - एकमेकांना सहकार्य करण
    • चेहरा पडणे - लाज वाटणे
    • काना मागे टाकने - दुर्लक्ष करणे
    • कान फुंकणे - एकमेकांबद्दल चुकली करणे
    • डोळ्यावर येणे - लक्षात येणे
    • तोंडात शेण घालने - पराकोटीची निंदा करणे
    • डोळे वटारणे - राग येणे
    • खंत वाटणे - खेद वाटणे
    • गहिवरून जाणे - मनातून गलबलून जाणे
    • घर डोक्यावर घेणे - खूप गोंगाट करणे
    • घास मोडणे - जेवणे
    • चीट पाखरू नसणे - शांतता असणे
    • खालावत जाणे - कमी होत जाणे
    • जळून खाक होणे - राख होणे
    • चाल करून येणे - हल्ला करणे
    • गौरव करणे - सन्मान करणे
    • गट्टी जमणे -मैत्री होणे
    • पाय धरणे - माफी मागणे
    • पोटात आग पडणे - भूक लागणे
    • मांडीवर घेणे - दत्तक घेणे
    • नाकाने कांदे सोलणे - आगाऊपणाने बोलणे
    • नाक कापणे - घोर अपमान करणे
    • तोंड काळे करणे - कायमचे कुठेतरी निघून जाणे
    • नजर चुकवणे - न दिसेल अशी हालचाल करणे
    • डोळे वटारणे - रागावने
    • तोंडात बोट घालने - आश्चर्य वाटणे
    • पोटाला चिमटा घेणे - अत्यंत काटकसरीने राहणे
    • पाठ दाखवणे - समोरून पळून जाणे
    • डोळा लागणे - झोप लागने
    • तोंडघशी पडणे - विश्वासघात करणे
    • दात ओठ खाणे - चिड व्यक्त करणे
    • तोंडात शेण घालने - पर कोटीची निंदा करणे
    • पाठबळ असणे - आधार असणे
    • मुठीत असणे - ताब्यात असणे
    • रक्त आठवने - अति कष्ट करणे
    • नाकी नऊ येणे - फार दगदग होणे
    • नवल वाटणे - आश्चर्य वाटणे
    • आडवे होणे - झोपणे
    • करामत करणे - चमत्कार करणे
    • उत्तेजन देणे - प्रोस्ताहन देणे
    • आभाळ फाटणे - सर्व बाजूने संकटे येणे
    • कसूर ना करणे - चुका न करणे
    • उंटावरून शेळ्या हाकणे - कामापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे
    • कचाट्यात सापडणे - तावडीत सापडणे
    • आभाळ कोसळणे - मोठे संकट येणे
    • कटकट वाटणे - त्रास वाटणे
    • कुंपणाने शेत खाणे - ज्याच्या हाती रक्षणाचे काम आहे त्यानेच नुकसान करणे
    • कोंड्याचा मांडा करणे - गरिबीच्या परिस्थितीत काटकसरीने पण समाधानाने राहणे
    • कथा लावणे - हिताची गोष्ट सांगणे
    • कळवणे लावणे - भांडण लावणे
    • एट मिरवणे - रुबाब करणे
    • ओढताना होणे - त्रासदायक धावपळ होणे
    • कमीपणा वाटणे - अपमान वाटणे
    • आभाळाची कुऱ्हाड पडणे - मोठे संकट येणे
    • आनंदाने उडणे - खूप आनंद होणे
    • कालवा उडणे - गडबड गोंधळ होणे
    • काळजात धस होणे - खूप घाबरणे
    • अप्रूप असणे - कौतुक वाटणे
    • हात देणे - मदत करणे
    • आगीत तेल वतने - आधीच्या भांडणात आणखीन भर घालने
    • हात झटकणे - नामा निराळा होणे
    • हाडे खिळखिळी करणे - भरपूर  मार देणे
    • हात घाई वर येणे - मारामारीची वेळ येणे
    • आत्मसात करणे - मिळवणे
    • हातावर तुरी देणे - डोळ्यात देखत फसवून पळणे
    • गौरव करणे - सन्मान करणे
    • ताव मारणे - खूप खाणे
    • डाव साधने - संधी मिळताच जिंकणे
    • चक्र फिरणे - त्वरित परिस्थिती बदलणे
    • खोड मोडणे - अद्दल घडवणे
    • जाळून खाक होणे - जळून नाश पावणे
    • गहिवरून जाणे - मनातून गलबलून जाणे
    • चाल करून येणे - हल्ला करणे
    • चंग बांधणे - निश्चय करणे
    • चीज होणे -  घेतलेली मेहनत सफल होणे
    • तल्लीन होणे - गुंग होणे
    • वाट लागणे - नुकसान होणे
    • वाकोल्या दाखवणे - चिडवणे
    • हा हा म्हणता पसरणे - अगदी थोड्या वेळात त सगळ्यांना कळवणे
    • हेवा वाटणे - द्वेष करणे
    • हेळसाड करणे - आबाळ करणे
    • वन वन सहन करणे - त्रासदायक भटकंती सहन करणे
    • रिंगण धरणे - फेर धरणे
    • माशी शिंकणे - कामात विघ्न येणे
    • मूग गिळणे - दुर्लक्ष करून गप्प बसणे
    • रात्रंदिवस घाम काढणे - खूप कष्ट करणे
    • विचारपूस करणे - चौकशी करणे
    • व्याकुळ होणे - कासावीस होणे
    • रंगात येणे - खूप मजा करणे
    • मात करणे - विजय मिळवणे
    • लालूच दाखवणे - मोहात पाडणे
    • वाईट दिवस येणे - हालाखीची परिस्थिती निर्माण होणे
    • वाया न घालने - फुकट जाऊ न देणे
    • मार्गी लावणे - नीट व्यवस्थित करणे
    • मागावर असणे - शोधत असणे
    • वचपा काढणे - बदला घेणे
    • वाट वाकडी करणे - वाट बदलून दुसरीकडे जाणे
    • वाली भेटणे - आधार देणारा माणूस भेटणे
    • वाहवा करणे - स्तुती करणे
    • सुसाट पळणे - वेगात पळणे
    • हात बसणे - पक्का सराव होणे
    • शॉक बसणे - मनाला हादरा बसणे
    • सुळावर चढवणे - फाशीवर देणे
    • सळो की पळो करणे - सतावून सोडणे
    • सुगावा लागणे - अंदाज लागणे
    • हाणून पाडणे - अडवणे
    • होळी करणे - चांगल्या गोष्टीचा नाश करणे
    • सावध करणे - भान देणे
    • शोभा करणे - नाचक्की करणे
    • शंख करणे - आरडाओरडा करणे
    • सैरावैरा पळणे - वाट मिळेल तिकडे पळणे
    • शपथ घेणे - प्रतिज्ञा करणे
    • सार्थकी लागणे - धन्यता पावणे
    • सवड मिळणे - मोकळा वेळ मिळणे
    • हाती काही न लागणे - काहीच फायदा न होणे
    • वचपा काढणे - बदला घेणे
    • हात जोडणे - नम्रपणे विनंती करणे
    • सांभाळ करणे - पालन पोषण करणे
    • समजूत काढणे - गैरसमज दूर करणे
    • सुळसुळाट होणे - अमर्याद वाढ होणे
    • हरभऱ्याच्या झाडावर चढणे - खोटी स्तुती करणे
    • हसून हसून पोट दुखणे - खूप हसू येणे
    • हट्टासं पेटणे - स्वतःच्या मनासारखे होण्यासाठी वाटेल ते करणे
    • हिऱ्याला पैलू पाडणे - तरबेज करणे
    • मेतकूट जमणे - मैत्री होणे
    • पाणी सोडणे - त्याग करणे
    • पाण्यात पाहणे - द्वेष करणे
    • धुळीला मिळवणे - नाश होणे
    • पराचा कावळा करणे - अतिशयोक्ती करणे
    • पसार होणे - पळून जाणे
    • पदर मोड करणे - स्वतःसाठी ठेवलेल्या पैशातून दुसऱ्यासाठी खर्च करणे
    • धडकी भरणे - खूप भीती वाटणे
    • दाह होणे - शरीराचे आग होणे
    • दुवा देणे - आशीर्वाद देणे
    • धरतीवर कोसळणे - मरण पावणे
    • नाव उंच करणे - मानाचे स्थान मिळवणे
    • ध्यान लावणे - डोळे मिटून एकाग्र होणे
    • दिवस पालटणे - परिस्थिती बदलणे
    • धडकत नसणे - संकटातून सुटण्याची आशा न उरणे
    • धूळ चारणे - पूर्ण पराभव करणे
    • घर चालणे - कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे
    • गणती करणे - मोजणी करणे
    • तत्पर असणे - तयार असणे
    • तोंडावाटे शब्द न फुटणे - खूप घाबरल्यामुळे बोलती बंद होणे
    • थैमान घालने - उच्छाद मांडणे
    • दणाणून सोडणे - सतत आवाज करीत राहणे
    • टंगळ मंगळ करणे - काम टाळणे
    • जीवाला जीव देणे -वाटेल ते मोल देऊन दुसऱ्याला मदत करणे
    • डाळ न शिजणे - काम न साधने
    • पारडे फिरणे - एकदम परिस्थिती बदलणे
    • पोपटपंची करणे - अर्थ न समजता पाठ करणे
    • फडशा पाडणे - खाऊन टाकले
    • बचत करणे - भविष्यासाठी संग्रह करणे
    • भंडावून सोडणे - सतावून सोडणे
    • पोरकी होणे - अनाथ होणे
    • पाणी पाजणे - पराजित करणे
    • धाप लागणे - खूप पळाल्यामुळे दम लागणे
    • नाव सोनेरी अक्षरता उमटवणे - नाव कायमचे कोरले जाणे
    • पटाईत असणे - तरबेज असणे
    • निवृत्तर होणे - उत्तर न सुचणे
    • झुंबड उठणे - गर्दी होणे
    • टोमणा मारणे - खोचक बोलणे
    • तोंड सुकणे - चेहरा फिका पडणे
    • जीव वर खाली होणे - काळजी वाटणे
    • जीवाचे रान करणे - प्रयत्नाची पराकाष्टा करणे 
    • खो घालने - एखाद्या कामाला विघ्न आणणे
    • आढेवेढे घेणे - इच्छा असूनही नकार दर्शवण्याचा प्रयत्न करणे
    • हात घाई वर येणे  - मारामारीची पाळी येणे
    • हात आखडणे - देण्याची क्षमता असतानाही कमी देणे
    • निपचित पडणे - स्थिर राहणे
    • फसगत होणे - फसवणूक होणे
    • गंध नसणे - अजिबात माहिती नसणे
    • घरोबा असणे - जिव्हाळ्याचे संबंध असणे
    • तोंडाला कुलूप घालने - एकदम गप्प बसणे
    • डोके घालने - लक्ष देणे
    • गळ्यापर्यंत बुडणे - कर्जबाजारी होणे

    • vakyaprachar in marathi with meanin

    लेबल:

    गुरुवार, ३० मार्च, २०२३

    म्हणी व अर्थ | Marathi Mhani

     म्हणी व अर्थ|Proverbs  in Marathi


    Marathi Mhani
    Marathi Mhani

    म्हणी व अर्थ | Marathi Mhani

        मराठी म्हणी आपल्या बोली भाषेत अनेक सुंदर अर्थाच्या म्हणी आहेत. म्हणी या अतिशय सुंदर व अर्थपूर्ण असतात रोजच्या जिवनात जीवन जगत असताना येणार्‍या अनुभावातून कदाचित या म्हणी तयार झाल्या असाव्यात. म्हणी व अर्थ | Proverbs  in Marathi  

    1. अति तिथे माती .                                                            
     अर्थ-कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.       
                     
    2. अंथरूण पाहून पाय पसरावे.                                           
    अर्थ- आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा.  
                                     
     3. आयत्या बिळावर नागोबा.                                                       
    अर्थ- एखाद्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा      घेण्याची वृत्ती असणे.                                                               
    4. अति शहाणा त्याचा बैल रिकामा.                                    
     अर्थ- जो माणूस फार शहाणपणा करायला जातो, त्याच्या हातून काम बिघडते.                               

    5. आगीतून फुफाट्यात.                                                            
    अर्थ-  लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे.            

    6. आलिया भोगासी असावे सादर.                                         
    अर्थ- जे नशिबात असेल, ते भोगायला तयार असावे.                  

    7. आयत्या बिळात नागोबा.                                                 
    अर्थ- दुसऱ्यांच्या कष्टावर स्वार्थ साधने.                                      

    8. आवळा देऊन कोहळा काढणे.                                         
    अर्थ- किरकोळ वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.      

    9. अडला हरी गाढवाचे पाय धरी.                                               
    अर्थ- शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते.   

     10. आपला हात जगन्नाथ.                                                       
    अर्थ- आपले काम करण्यासाठी स्वतः कष्ट करणे हेच योग्य ठरते. म्हणी व अर्थ| "Marathi Mhani"  
      
    11. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन.                            
    अर्थ- किमान लाभाची अपेक्षा केली असताना, अपेक्षेपेक्षा काहीतरी अधिक लाभ होणे.  
                     
             
    12. इकडे आड, तिकडे विहीर.                                          
    अर्थ- दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे.                  

     13. एक ना धड, भाराभर चिंध्या.                                        
    अर्थ- एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे.                                   
    14. उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग.                                       
    अर्थ- उतावळेपणाने मुर्खासारखे वर्तन करणे.                          
     
    15. एका हाताने टाळी वाजत नाही.                                          
    अर्थ- कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूकडील माणसे जबाबदार असतात.    
                               
    16. उथळ पाण्याला खळखळाट फार.                                    
    अर्थ- ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात, तो मनुष्य फार बढाई मारतो.    
                                        
     17. ऐकावे जनाचे करावे मनाचे.                                             
    अर्थ- कोणत्याही कामाबाबत दुसऱ्याचे मत घ्यावे परंतु शेवटी आपल्याला जे योग्य वाटेल ते विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे.                    
                                                                
    18. करावे तसे भरावे.                                                           
     अर्थ- दुष्कृत करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच.       

    19. कामापुरता मामा.                                                           
     अर्थ- गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस.        
                   
    20. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.                     
    अर्थ- एखादे भयंकर संकट येऊन त्यातून सही सलामत सुटका होणे 

    21. आईचे माया अन, पोर जाईल वाया                                     
     अर्थ- अति लाड केले तर मुले बिघडतात.                                   

    22. काखेत कळसा, गावाला वळसा.                                       
     अर्थ- हरवली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे.                                                                       
     23. काळाला होता, पण वेळ आली नव्हती.                                 
    अर्थ- एखादे घर संकट येऊ नाही त्यातून सही सलामत सुटणे.         

     24. खान तशी माती.                                                            
    अर्थ- आई-वडिलांप्रमाणे मुलाची वर्तणूक असणे.                        

    25. खायला काळ, भुईला भार.                                              
    अर्थ- निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो.                               

     26. गरजवंतांना अक्कल नसते.                                              
    अर्थ- गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्ट सुद्धा मान्य करावे लागते.                                                                               
     27. गरज सरो, वैद्य मरो                                                          
    अर्थ- आपले काम संपतात उपकार कर्त्याला विसरले.                   

    28. गाढवाला गुळाची चव काय?                                             
    अर्थ- अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही.                    

    29. गुरुची विद्या गुरुला फळली.                                              
    अर्थ- एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.                                  

    30. गोगलगाय नि पोटात पाय                                                  
    अर्थ- एखाद्याचा खरे स्वरूप न दिसणे.                                       

    31. घरोघरी मातीच्या चुली.                                                    
    अर्थ- सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.                                     

     32. चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे                                  
    अर्थ- प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच.                                                                       
    33. चोराच्या मनात चांदणे.                                                      
    अर्थ- आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटत राहणे.                                                                               
     34. चोर सोडून संन्याशाला सुळी देणे.                                       
    अर्थ- अपराध्याला सोडून निरप्राध्याला शिक्षा देणे.                       

    35. चोरावर मोर.                                                                 
    अर्थ- एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे.           
     
    36. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.                              
    अर्थ- मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही.                                 

     37. ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी                          
    अर्थ- ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे.        

    38. झाकली मूठ सव्वा लाखाची                                          
    अर्थ- मौन पाळून अब्रू राखणे.                                               

    39. डोंगर पोखरून उंदीर काढणे.                                            
    अर्थ- अतोनात परिश्रम मेहनत करूनही अत्यल्प फायदा होणे        

    40. तळे राखी, तो पाणी चाखी                                                    
    अर्थ- एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपभोग घेणारच.                                                               
    41. तहान लागल्यावर विहीर खणणे.                                     
    अर्थ- एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे                                                                      
    42. ताकापुरती आजी.                                                           
    अर्थ- स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याची गुणदान करणे                  

    43. दगडापेक्षा वीट मऊ.                                                        
    अर्थ- मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे.                  

    44. थेंबे थेंबे तळे साचे.                                                          
    अर्थ- थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो                                                                          
    45. दाम करी काम.                                                              
    अर्थ- पैशाने सर्व कामे साध्य होणे.                                             

    46. दुरून डोंगर साजरे.                                                         
    अर्थ- कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते                                                                  
    49. देश तसा वेश                                                                  
    अर्थ- परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे.                            

    50. दिव्याखाली अंधार.                                                           
    अर्थ- मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच 

    51. देव तारी त्याला कोण मारी?                                              
    अर्थ- देवाची कृपा असल्यावर आपले कुणीही वाईट करू शकत नाही अशी भावना                                                                  
    53. दोघांचे भांडण तिसऱ्याला लाभ.                                       
    अर्थ- भांडण करणाऱ्याचा काहीही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचा फायदा होणे.                                                          
    54. नव्याचे नऊ दिवस.                                                        
    अर्थ- एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोड कौतुक केले जाणे.       

    55. नाव मोठे, लक्षण खोटे.                                                   
    अर्थ भपका मोठा पण वस्तू स्थिती नेमकी विरुद्ध असणे.                

    56. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.                         
    अर्थ- केलेल्या उपदेशाचा काहीही उपयोग न होणे.                        

    57. नाचता येईना अंगण वाकडे.                                                 
    अर्थ- आपल्यातील कोणीपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.                                                                                    
    58. नाकापेक्षा मोती जड.                                                          
    अर्थ- कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठाहून वर चढ होणे; आपल्या सोयीसाठी केलेली गोष्टच आपणास तापदायक  

    59. नावडतीचे मीठ अळणी.                                                   
    अर्थ- नावडत्या माणसाने केलेले चांगले काम देखील वाईट दिसते.   

    60. पळसाला पाने तीनच                                      
    अर्थ- कुठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे.          

    61. पालथ्या घागरीवर पाणी.                                                    
    अर्थ- केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे              

    62. प्रयत्नांती परमेश्वर.                                                            
    अर्थ- कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते.                                                            

    63. पाचही बोटे सारखी नसतात.                                              
    अर्थ- सर्व माणसे सारख्याच स्वभावाची व योग्यतेची नसतात.                           

    64.  पी हळद मी हो गोरी                                                          
    अर्थ- कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे.                                                                          
    65. बळी तो कान पिळी                                                                              
    अर्थ- बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो.                     

     66. पदरी पडले पवित्र झाले.                                                     
    अर्थ- कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की त्यातील दोषांकडे दुर्लक्ष करून समाधान मानणे.                                                    
    67. बैल गेला नि झोपा केला.                                                    
    अर्थ- एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते                                                                            
    68. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.                                
    अर्थ- एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.                     

    69. मनी वसे ते स्वप्नी दिसे.                                                     
    अर्थ- जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडणे.                                     

    70. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात                                      
    अर्थ- एखाद्याच्या भावी कर्तबघारीचा अंदाज त्याच्या बालपणीच बांधता येतो                                  

    80 लहान तोंडी मोठा घास                                                      
    अर्थ- आपल्या योग्य तेस न शोभेल असे वर्तन करणे                      

    81. वासरात लंगडी गाय शहाणी                                              
    अर्थ- अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते.              

    82. रात्र थोडी संगे फार.                                                       
    अर्थ- कामे पुष्कळ पण ती पार पडायला वेळ न पुरणे.                    

    83. लेकी बोले, सुने लागे.                                                        
    अर्थ- एकाला उद्देशून; पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.           

    84. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली       
    अर्थ- एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तम, नाही तर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे                                                   
    85. कोल्हा काकडीला राजी.                                                  
    अर्थ- सामान्य कुवतीची माणसे शूद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात                                                                                 
    86.  भित्या पाटी ब्रह्म राक्षस.                                                 
    अर्थ- भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात.                          

    87. बोलायचाच भात आणि बोलायचीच कडी.                          
    अर्थ- प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे.                         

    88. भरवशाच्या म्हशीला टोणगा.                                              
    अर्थ- ज्याच्याकडून खात्रीने अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षा भंग होणे. 

    89. शितावरून भाताची परीक्षा.                                               
    अर्थ- एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे

    90. शेंडी तुटो की पारंबी तुटो.                                                 
    अर्थ- दृढ निश्चय करणे.                                                         

    91. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही.                                     
    अर्थ- माणुस कितीही संकटाला तर सापडला तरी आपला स्वभाव सोडत नाही                                                                          
    92. हसतील त्याचे दात दिसतील                                               
    अर्थ - चांगली गोष्ट करताना निंदा करणाऱ्याची किंवा टिंगल करणाऱ्याची परवा न करणे.                                                    
    93. सरड्याची धाव कुंपणापर्यंत.                                              
    अर्थ- सामान्य कुवतीच्या माणसाची झेप विशिष्ट मर्यादितच असते.   

    94. शेरास सव्वाशेर.                                                             
    अर्थ- समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे.                                                                                 
    96. हजीर तो वजीर                                                                  
    अर्थ- जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल.      

    97. हत्ती गेला आणि शेपूट राहिले                                             
    अर्थ -कार्याचा मोठा भाग पार पाडून थोडेसे कार्य शिल्लक राहणे.   

    98. हाताच्या काकणाला आरसा कशाला?                                 
    अर्थ- प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते.                

    99. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.                                          
    अर्थ- दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे                         

    100. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे.                            
    अर्थ -जे खात्रीपूर्वक सहज मिळण्यासारखे आहे ते सोडून ज्याच्या मिळण्याबद्दल खात्री नाही ते मिळण्याचा प्रयत्न करणे.

    लेबल: