पारंपारिक मोठी उखाणे|Ukhane
रुणझुण जुन्यात, बसले महिन्यात
खणचोळी अंगात, शेंदूर भंगार,.
सुपारी ओटीत, लवंगा मुठीत.
चीन गती वाडा, वाड्याला कुलूप.
उघडली खोली, खोलीत हांडे सात
हंड्यावर परात, परातीत दही भात.
भात वाढला केळीच्या पानावर
भातावर टाकले तूप.
..... राव बसले जेवायला.
वाढते त्यांना प्रेमाने हेच माझ्यासाठी
स्वर्गीय सुख
- वाड्यात वाडे, सात वाडे. सात वाड्याला, सात दार. सात दाराला ,सात कड्या. सात कड्यांना, सात कुलूप चिरेबंदी आहे वाडा धुण्याला पर्टीन. पाण्याला कोळीन, स्वयंपाकाला आचारीन. .... रावांच्या जीवावर मी झाले कारभारी
- हंड्यावर हंडे सात हांडे, त्यावर ठेवली परात. परातीत होते सातू ,सातूचा केला भात भातावर वरण, वरणावर तुपाची धार. तुपा सारखा रूप, रूपा सारखा जोडा जोड्यात हलगडी, हलगडीत बलगडी. बलगडीत पिंजरा, पिंजऱ्यात राघू. राघूच्या तोंडी उंबर. .... रावाचं नाव ऐकलं ना मग काढा. रुपये शंभर
- वडगाव माझं सासर, सोलापूर माझं माहेर. गावात घर, घरासमोर अंगण. अंगणात मोठे प्रांगण, प्रांगणात तुळशीचे वृंदावन. वृंदावना समोर रांगोळी, नाव घेते हळदीच्या वेळी नाव घ्या नाव घ्या, नावात काय असतं. नावात असतं, लहानाचं मोठेपण. मोठ्यांचं थोर पण, थोरांचा मान. तोच आमचा स्वाभिमान. ... रावांचं नाव घेऊन ठेवते सर्वांचा मान
- नाकात नथ, पायात जोडवी पैठणी नेसते, लक्ष्मीसारखी कानात कुड्या, हातात पाटल्या बांगड्या मध्येच , किणकीनती वेणीत खोपा, नऊवारी साडी. कपाळी चंद्रकोर, कोरलेली. भांगात कुंकू, हातात तोडे. गळ्यात चंद्रहार, मनी शोभते. साक्षात लक्ष्मी, लक्ष्मीचे स्वागत करते. .... रावांचं नाव घेऊन लक्ष्मी पूजन करते

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ