सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

संत गाडगेबाबा | Sant Gadge Baba Information In Marathi

  संत गाडगेबाबा|Sant Gadge Baba Information in marathi


संत गाडगेबाबा|Sant Gadge Baba Information in marathi


संत गाडगेबाबा|Sant Gadge Baba Information in marathi

                                         देव नाही दगडात , 

                                    देव नाही दगडात, 

                             देव दाखविला तुम्ही ,

                                माणसाच्या हृदयात/.  

संत गाडगेबाबा | Sant Gadge Baba Information In Marathi

    गाडगेबाबा हे गोरगरीब आणि दिंनदलित त्यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा व अस्वच्छता त्यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाज सुधारक होते. गाडगे महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ साली अमरावती जिल्ह्यातील शेडगाव गावी झाला. सामाजिक सुधारणा व सामाजिक न्याय व स्वच्छता या विषयात रुची असणारे महाराज म्हणजे संत गाडगे महाराज. संत गाडगे महाराज यांचे संपूर्ण नाव डेमोजी झिंगराजी जानोरकर असे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी आणि आईचे नाव सखुबाई असे होते.

     दिन, दलित, व पिडीतांची  सेवा करणारे व्यक्तिमत्व म्हणजे म्हणजे संत गाडगेबाबा.  डोक्यावर खापर तुकड्याची टोपी एका कानात कवडे तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगड्याची काच एका हातात झाडू, तर दुसऱ्या हातात मडके असा वेश होता. संत गाडगेबाबा म्हणजे एक चालती बोलती पाठशाला होती. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी स्वच्छता आणि चारित्र्य यांची शिकवण दिली. ते गोरगरीब अंधश्रद्धा आणि अस्वच्छता, अज्ञान यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने काम करणारे समाज सुधारक होते. त्यांनी आयुष्याकडे खूप बारकाईने पाहिले होते. संपूर्ण दिवसभर ते गावातील घाण कचरा साफ करत असत. त्यांच्यासोबत ते नेहमी झाडू ठेवत असत. पोटापुरते अन्न मागून खायचे व रात्री किर्तन करून समाज प्रबोधन करायचे. अंधश्रद्धा, रीत रीवाज, दिखाऊ पणा, व्यसन याचे परिणाम किती वाईट असू शकतात हे ते कीर्तनातून समजावून सांगत असत. समाजातील  रूढी, परंपरा यावर टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देत. खर्च नका देवासाठी पैसा शिक्षणाला पैसा तोच द्या हो नको नको मंदिराची करावयास भर छात्र जो हुशार त्यास द्यावा. तीर्थी धोंडा देव पाणी रोकडा सजनी असे ते नेहमी म्हणत असतात. ते गोरगरीब दिन दुबळ्या अपंगत्व व अंधश्रद्धा लोकांची सेवा करण्यास आनंद मानत असत. लोकांकडून मिळालेल्या पैशांमधून महाराज खेड्यापाड्यांमध्ये शाळा धर्मशाळा प्राण्यांची निवासस्थानी रुग्णालय बांधत असत. 

संत गाडगेबाबा|"Sant Gadge Baba Information in marathi"

    बाबा कधीही एका ठिकाणी राहत नसत. ते एकटे गावोगावी प्रवास करायचे देवळात जाऊ नका मूर्ती पूजा करू नका सावकाराचे कर्ज काढू नका. मंत्र व चमत्कार अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका. अडाणी राहू नका अशी शिकवण त्यांनी दिली. देव दगडात नसून तो माणसात आहे अशी शिकवण ते लोकांना देत असतात. ते वराडी भाषा बोलत असत. संत व समाज सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगे महाराजात होत्या. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे त्यांचे आवडते भजन होते. आज देखील राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था त्यांच्या केलेल्या कार्यातून प्रेरणा घेत आहे तर त्यांचीसमाजसेवा पाहता भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ अनेक पुरस्कार दिले आहेत. सन 2000 मध्ये संत गाडगेबाबा गाव स्वच्छता मोहीम सुरू केली. गाडगे महाराज संत तुकाराम महाराजांना आपली गुरु मानत असत. आपले विचार जनमानसात त्यांनी त्यांनी काही वेळा संत तुकारामाच्या अभंगा चा वापर केला रंजले गांजलेले लोक दिन दुबळे लोक. आणि अपंग लोकांसाठी गाडगे महाराज हेच देव असे होते.   २० डिसेंबर 1956 साली संत गाडगे महाराजांचा मृत्यू झाला. हल्ली गाडगे महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातील काही गावाच्या स्वच्छ ग्रामपंचायत आणि गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार दिला जातो.





0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ