पंडित जवाहरलाल नेहरू| Pandit Jawaharlal Neharu information in marathi
![]() |
| Pandit Jawaharlal Neharu information in Marathi |
आधुनिक भारताचे रचनाकार ,लोभस आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या स्वतंत्र देशाचे पहिले पंतप्रधान होते. भारतीय स्वतंत्र चळवळीतील एक महान क्रांतिकारक सुद्धा होते. त्यांचे संपूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथील एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल आणि त्यांच्या आईची नाव स्वरूपराणी असे होते. मोतीलाल नेहरू हे विख्यात कायदे पंडित होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांची प्राथमिक शिक्षण घरीच झाले उच्च शिक्षणासाठी त्यांनी लंडन मधील त्यांनी हॅरो या स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पुढे ते क्रेबीज या विद्यापीठात शिक्षण घेऊन ते पदवीधर झाले. ते इसवी सन 1912 मध्ये भारतात येऊन वकिली करू लागले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1916 साली वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी कमला कौल यांच्याशी विवाह केला. 19 नोव्हेंबर 1917 रोजी त्यांना कन्यारत्न प्राप्त झाली त्या कन्येचा नाव इंदिरा असे ठेवण्यात आले. जवाहरलाल आणि कमला या नेहरू दांपत्याचे इंदिरा गांधी हे एकमेव अपत्य होते. पंडित जवाहरलाल नेहरू प्रथमच 1916साली महात्मा गांधी यांना भेटले. तेव्हापासून ते महात्मा गांधी यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. 1920 साली त्यांनी उत्तर प्रदेश मधील प्रतापगड जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. पंडित नेहरू यांना 1920 ते 1922 दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा करावा लागला. नेहरू यांना 1928 मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाटी हल्ल्याला सामोरे जावे लागले होते. याच साली त्यांनी स्वातंत्र्य भारताचे चळवळ सुरू केली 1929 साली ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले 1930 ते 1935 दरम्यान. मिठाचा सत्याग्रह तसेच अनेक सत्याग्रहामुळे त्यांना अनेक वेळा करावास भोगावा लागला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 14 फेब्रुवारी 1935 रोजी अल्मोडा जेलमध्ये आत्मचरित्र पूर्ण केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर ,बालदिन ,म्हणून साजरा केला जातो. पंडित नेहरू यांच्या मते लहान मुले हे उद्याचे उज्वल भविष्य आहेत लहान मुलांच्या उज्वल भविष्यावर देशाचे उज्वल भविष्य अवलंबून आहे...


0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ