मराठी उखाणे | Lagnatil Marathi Ukhane
मराठी उखाणे | Lagnatil Marathi Ukhane
मराठी उखाणे | Lagnatil Marathi Ukhane
लग्न म्हणले की चौफेर आनंदी वातावरण आणि व त्याच आनंदात आणखीनच भर घालण्याची गोष्ट म्हणजे उखाणे. अगदी नवरीमुलगी वरपक्षाकडे प्रवेश करण्यापासून ते संपूर्ण लग्न पार पडेपर्यंतच्या कार्यक्रमाच्या सर्व टप्प्यावर उखाणे आवर्जून घेतले जातात.
प्रेम रूपी दिव्यात लावते प्रीतीची वात.
.... रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात
पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल.
श्रीकृष्णाने लिहिली भगवत गीता.
गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र.
नेत्राच्या निरंजनी अश्रूच्या वाती.
अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस.
नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष.
जन्म दिले आईने पालन केले पित्याने.
ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल.
लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा.
देवा ब्राह्मणाच्या साक्षीने बांधल्या सात जन्माची गाठ.
तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून.
काचेच्या प्लेटात गाजराचा हलवा.
प्रेमाचा पाऊस प्रीतीचा गारवा.
लग्न झाल्यावर मुलगी होते माहेरची पाहुणी.
.... रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात
पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल.
.... रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल
श्रीकृष्णाने लिहिली भगवत गीता.
.... राव माझे राम तर मी त्यांची सीता
गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र.
... रावांनी घातली मला सर्वांसमोर मंगळसूत्र
नेत्राच्या निरंजनी अश्रूच्या वाती.
.... रावांसाठी सोडली मी माहेरची नाती
अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस.
.... रावांचं नाव घ्यायला कसला आला आळस
नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष.
.... राव माझे मिस्टर तर मी त्यांची मेसेस.
जन्म दिले आईने पालन केले पित्याने.
.... रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने
ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल.
.... रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल
लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा.
.... रावांचं नाव घेऊन उखाणा करते पुरा
करवंदाची साल चंदनाची खोड.
.... रावांचे बोलणे अमृता पेक्षा गोड.
नाव घ्या नाव घ्या हा कसला कायदा.
.... रावांचा नाव घेते पण तुमचा काय फायदा
हातात अंगठी अंगठीत हिरा.
.... रावांसारखे पती मिळाले हाच भागोदय खरा
देवा ब्राह्मणाच्या साक्षीने बांधल्या सात जन्माची गाठ.
.... रावांचं नाव घेते सोडा माझी वाट
तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून.
.... रावांचं नाव घेते.... यांची सून
काचेच्या प्लेटात गाजराचा हलवा.
.... रावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा
चांदीचा करंडा सोन्याचा कळस.
.... रावांचं नाव घेते संध्याकाळच्या वेळेस
नीलवर्णी आकाशात लागली ढगाची चाहूल.
.... रावांचं नाव घेताच टाकते पहिले पाऊल
गुलाबाची फुल दिसायला ताजे.
.... रावांचं नाव घेते सौभाग्य आहे माझे
पहाटे पहाटे कोकिळा गाते स्वरात.
.... रावांचं नाव घेते येऊ द्या आता घरात
इंद्रधनुष्यात रंग असतात सात.
.... रावांचं नाव घ्यायला करते आज पासून सुरुवात
डब्यात डब्बे डब्यात आहे केक.
.... रावांचं नाव घेते.... यांची मी लेक
मुंबईची मुंबादेवी कलकत्त्याची कालिका.
.... रावांचं नाव घेते.... यांची बालिका
प्रेमाचा पाऊस प्रीतीचा गारवा.
.... रावांचा नाव ऐकण्यासाठी जमला गाव सारा
गोकुळच्या वनात कृष्ण वाजतो बासरी.
.... रावांच्या संसारात सुखी आहे मी सासरी
महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस.
.... रावांचा नाव घ्यायला मला नाही आळस
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वती ची जोडी.
.... रावांमुळे आली आयुष्याला गोडी
हसत खेळत संसाराची वर्ष सहज लोटणार.
.... रावा सोबत मी वयाची शंभरी गाठणार
लक्ष्मी बसते कमळावर सरस्वती बसते मोरावर.
.... रावांचं तेच माझ्या कपाळी कुंकवावर
सावळ्या हातावर खुलतो मेंदीचा रंग.
.... रावांचं नाव एकदाच माझ्या सख्या झाल्या दंग
मोगराचा गजरा गुलाबाचा हार.
.... रावांच्या रूपात मिळाला मला उत्तम जोडीदार
चंदनाचा पाठ सोन्याचा ताट आणि मोत्याचा घास.
.... रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास
लग्न झाल्यावर मुलगी होते माहेरची पाहुणी.
.... रावांच्या घरची झाले मी गृहिणी
सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खूण.
... रावांचं नाव घेते.... यांची सून
दारी होता टेबल त्यावर होता फोन.
.... रवाने दाखविला पिक्चर हम आपके है कौन
दत्ताला प्रिय आहे गाय महादेवाला प्रिय आहे नंदी.
.... रावांच्या जीवावर मी आहे आनंदी
पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्याची दाटी.
.... रावांचं नाव घेते खास मैत्रिणीसाठी
रातराणीच्या सुवासाने चाफा झाला मोहित.
.... रावांना आयुष्य मागते सासू-सासर्यासहित
तिळासारखा असावा स्नेह गोळा सारखी असावी गोडी.
ईश्वर सुखी ठेव माझी आणि.... रावांची जोडी
लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी.
.... रावांचं नाव घेते खास तुम्हाल सर्वांसाठी
मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध.
.... रावांसोबत मिळाला मला जीवनाचा आनंद
मंगळसूत्रात असतात काळे म्हणी.
.... राव माझे राजा तर मी त्यांची राणी
शिंपल्यात सापडले माणिक मोती.
.... राव माझे पती तर मी त्यांची सौभाग्यवती
दुधाचा केला चहा ,चहा बरोबर होती खारी.
.... रावांची आणि माझी जोडी जगात लईच भारी
डाळिंब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल.
.... रावांच्या नावाने कपाळी लावते कुंकू लाल
सात समुद्राच्या पलीकडे नाग नागिन ची वस्ती.
.... रावांचा आयुष्य लाभो माझ्यापेक्षा जास्ती
नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी.
.... राव माझे राजा तर मी त्यांची राणी
इंग्रजीमध्ये गवताला म्हणतात ग्रास.
.... रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास
लाल मनी तोडले काळे मनी जोडले.
.... रावांच्या जीवासाठी माहेर घर सोडले
रुक्मिणीने पण केला कृष्णाला लाच वरील.
.... रावाच्या साथीने आदर्श संसार करीन
चांदीच्या ग्लासात घट्ट घट्ट दही.
.... रावांच्या अंगठीवर माझीच सही
नाव घ्या नाव घ्या किती करतात गजर.
.... रावांचं नाव घेण्यास नेहमीच मी हजर
जून जुलै महिन्या त केव्हाही पडतो पाऊस.
.... राव माझे कॉम्प्युटर तर मी त्यांची माऊस
आकाशात उडतोय पक्षाचा थवा.
.... रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
रायगडावर केले मी शिवरायांचे दर्शन.
.... रावांच्या प्रेमासाठी संपूर्ण जीवन अर्पण
ब्रह्म विष्णू महेश त्रिमूर्ती आहेत साक्षात.
.... रावांचं नाव घेते राहू द्या लक्षात
संसार रुपी सागरात पती-पत्नीची नका.
.... रावांचं नाव घेते सर्वजण ऐका
दहा मधून दहा गेले उरले शून्य.
.... राव माझे हेच माझे पुण्य
गोऱ्या गोऱ्या हातावर काढली मेहंदी.
.... रावांचं नाव घ्यायला येऊ वारंवार संधी
गृह कामाचे शिक्षण देते माता.
.... रावांचं नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता
साडी घालते फॅशनची पदर घेते साधा.
.... राव माझे कृष्ण तर मी त्यांचे राधा
मन असावे प्रेमळ आणि पवित्र.
.... रावांच्या जीवनात राहो आनंद सर्वत्र
जाई जुईच्या खाली हरिण घेते विसावा.
.... रावांचं नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा
कपाळाला लाल कुंकू गळ्यात मोत्याचा हार.
.... रावांचं नाव घेताना आनंदी आहे मी फार
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने व फुले.
.... रावांचं नाव घेतात चेहरा माझा खुले
नीलवर्णी आकाशात पडतात पावसाच्या सरी.
.... रावांचं नाव घेते आले मी आज नव्या घरी
मोत्याची नथ सोन्याच्या तारेने गुंफली.
.... रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली
सोन्याची घागर अमृताने भरावी.
.... रावांची सेवा मी जन्मभर करावी
राम राज्यात मारले बाण कृष्ण राज्यात केल्या बायका.
.... रावांचं नाव घेते सर्वजण ऐका
नाव घ्या नाव घ्या नाव तरी काय घ्यायचं.
.... रावांना शेवटी आहोत म्हणायचं
भारताच्या पश्चिमेला आहे महाराष्ट्र.
....राव माझे सर्वात श्रेष्ठ
लग्नाच्या सोहळ्यात सगळे झाले जॉईन.
.... राव माझे हिरो तर मी त्यांची हिरोईन
ये ग ये ग सरी म्हणतात सर आले धावून.
..... राव माझ्या प्रेमात पडले फेसबुक वर लाईक पाहून
जिजाऊ सारखे माता शिवाजी सारखा पुत्र.
.... रावांच्या नावाने गळ्यात घातले मी मंगळसूत्र
नव्हते मी सुंदर तरीही मला निवडले.
.... रावांचे हेच रूप मला खूप आवडले
महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून.
.... रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून
नदीच्या काठी कृष्ण वाजतो बासरी.
.... रावांचं नाव घेते सुखी आहे मी सासरी
स्वातंत्र्याचा दिन उगवतो 15 ऑगस्ट च्या दिवशी.
.... रावांचा नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी
हिरव्या हिरव्या साडीला काट आहे जर तारी.
.... रावांचा नाव घेते शालू नेसून भारी
अंगणी होती उंबर उंबराला आला भार.
.... रावांनी साडी घेतली मला हिरवी हिरवीगार
मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर.
.... रावांनी दिला मला सहभाग्याचा आहेर
चांदीच्या परातीत केशरी होते पेढे.
.... राव सोडून बाकी सगळे वेडे
नाव घ्या नाव घ्या आग्रह कशासाठी.
.... रावांचं नाव होतं ओठावर पण थांबले मी उखाण्यासाठी
दत्ताच्या देवळात उदबत्त्यांचा वास.
.... रावांना भरवते पेढ्याचा घास
साठ्यांची बिस्किट बेडेकरांचा मसाला.
.... रावांच्या नावासाठी एवढा आग्रह कशाला
पुण्याच्या हायस्कूलमध्ये मुली खेळतात गेम.
.... रावांनी विचारला मला व्हाट इज युअर नेम
शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडल्या माती.
.... राव यातच हेच माझे जीवन साथी
जास्वंदाचा फुल गणपतीला वाहले.
.... रावांच्या प्रेमासाठी मुंबई शहर मी पाहिले
पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता.
.... रावांचं नाव घेते खास तुमच्या करिता
नाकातल्या नथेला सोन्याचा साज.
.... रावांचं नाव घेते हळदी कुंकू आहे आज
आधी आणले चंद्रहार मग आणले ठुशी.
.... रावांचं नाव घ्यायला मला होते खूप खुशी
चंदेरी सागरात रुपेरी लाटा रुपेरी लाटा.
.... रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा
आयुष्यात भागीदार संसारात साथीदार.
.... राव माझे आहे जीवनाचा जोडीदार
मोह असावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा.
.... रावांसोबत संसार करीन मी सुखाचा
पुरणपोळी वर वाढतात भरपूर तूप.
.... राव मला आवडतात खूप
चांदीचा ताट ताटलीत वाटी वाटीत शिरा.
.... राव माझे जगात लय भारी हिरा
माहेरच्या पाखराला लाभलं सासरच छत्र.
... रावांच्या नावाचं गळ्यात घालते मी मंगळसूत्र
माहेरच्या अंगणात गिरवले संस्काराचे पाठ.
.... रावांशी लग्न करून बांधली संसाराची काट
शुभ कार्याची सुरुवात होते श्री गणेशापासून.
.... रावांचं नाव घेते पैठणी आले मी नेसून
आभाळ भरले चांदण्याने चंद्र मात्र एक.
.... रावांचं नाव घेते.... यांची मी लेक



0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ