रविवार, ३० एप्रिल, २०२३

अलंकारिक शब्द








  1. अष्टपैलू - सर्व गुण संपन्न
  2. अकलेचा कांदा - मूर्ख
  3.  उंबराचे फुल - दुर्मिळ वस्तू
  4. अकलेचा खंदक - अत्यंत मूर्ख माणूस
  5. अकरावा रुद्र - अतिशय तापट माणूस
  6. ओनामा - सुरुवात
  7. कळवा वरचे पाणी - फार काळ टिकणारे
  8. उंटावरचा शहाणा - मूर्खपणाचा सल्ला देणारा
  9. कळसुत्री बाहुली - दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
  10. कोल्हे कोई - शूद्र लोकांची बडबड
  11. काडी पहिलवान - हाडकुळा
  12. कुंभकर्ण - अतिशय झोपाळू
  13. कळीचा नारद - कळ लावणारा
  14. कुप मंडूक - संकुचित वृत्तीचा
  15. खुशाल चेंडू - चैनी खोर माणूस
  16. गर्भ श्रीमंत - जन्मापासून श्रीमंत 
  17. गंडांतर - भीतीदायक संकट
  18. गाजर पारखी - कसलाही पारख नसलेला
  19.  गुरुकिल्ली - मर्म, रहस्य
  20. गंगा यमुना - अश्रू
  21. घोरपड - चिकाटी धरणारा
  22. घर कोंबडा - घराबाहेर न पडणारा
  23. चर्पटपंजरी - निरर्थक बडबड
  24. चौदावे रत्न - मार
  25. छातीचा आकडा - शत्रुत्व
  26. टोळभैरव - कामात नासाडी करणारे लोक
  27. गोगलगाय - गरीब निरुपद्रवी मनुष्य
  28. ताटाखालचे मांजर - दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा
  29. त्रिशंकू - धड ना इकडे धडणा तिकडे
  30. दगडावरची रेघ - कधीही न बदलणारे
  31. दळुबाई - भिकड मनुष्य
  32. पांढरा परीस - लबाड 
  33. पोपटपंची - अर्थ नकळता पाठांतर करणारा
  34. मायेचा पूत - पराक्रमी मनुष्य
  35. पिकले पान - म्हातारा
  36. मंथरा - दृष्ट स्त्री
  37. बोके संन्यासी - ढोंगी मनुष्य
  38. बोलाचीच कडी - केवळ शाब्दिक वचने
  39. भीष्मप्रतिज्ञा - कठीण प्रतिज्ञा
  40. बिन भाड्याचे घर - तुरुंग
  41. मेष पात्र - बावळट
  42. लंकेची पार्वती - अत्यंत गरीब स्त्री
  43. लंबकर्ण - बेअकली
  44. वाहतीगंगा - आलेली संधी
  45. श्री गणेशा - प्रारंभ
  46. वाटण्याच्या अक्षता - नकार
  47. वामन मूर्ती - डेंगू किंवा बुटका माणूस
  48. स्मशान वैराग्य - तत्कालीक वैराग्य
  49. सांबाचा अवतार - अत्यंत भोळा माणूस
  50. सुळावरची पोळी - जीव धोक्यात घालणारे काम
  51. सूर्यवंशी - उशिरा उठणारा
  52. रामबाण - अचूक गुणकारी
  53. लंकेची पार्वती - अंगावर एकही दागिना ठेवला नाही
  54. आडेल तट्टू - अतिशय हट्ट करणारा
  55. मारुतीचे शेपूट - लांब जाणारे काम
  56. सव्यसाची - उलट सुलट काम करणारा
  57. बोलायचीच कडी - केवळ शाब्दिक वचने
  58. उंबराचे फुल - अगदी दुर्मिळ वस्तू
  59. जय चंदिवृत्ती - द्रोही किंवा फितूर वृत्ती
  60. घाशीराम कोतवाल - अन्यायी माणूस
  61. घटोत्कच - कपटी व्यक्ती
  62. चतुर संबाजी - मूर्ख मनुष्य
  63. शेंदार शिपाई - भित्रा माणूस
  64. शेंडेफळ - शेवटचे बाळ
  65. खोगीर भरती - निरुपयोगी लोकांचा भरणा
  66. हंडा पळी - वीजोड जोडपे
  67. सरकारी पाहुणा - तुरुंगातील कैदी
  68. शंभू - धडधाकट पण निर्बुद्ध व्यक्ती
  69. झारीतील शुक्राचार्य - आपले आहेत चिंतनारी जवळची व्यक्ती
  70. शिराळ शेट्टी ऐश्वर्य - क्षणभंगुर ऐश्वर्या
  71. गळ्यातील ताईत - अतिशय प्रिय व्यक्ती
  72. मदनाचा पुतळा - अतिशय देखणा पुरुष
  73. मायासुरी प्रकार - नाटकी किंवा ढोंगी प्रकार
  74. पांढरा परीस - लबाड मनुष्य
  75. भोजन भाऊ - बिनकामी व एत खाऊ लोक
  76. पांढरा कावळा - निसर्गात किंवा अस्तित्वात नसलेले गोष्ट
  77. भोळा सांब - साधा भोळा माणूस
  78. होय बा - स्वतःचे बुद्धी न चालवता दुसऱ्याच्या मताचे समर्थन करणारा
  79. रडतराव - भीतीमुळे प्रत्येक गोष्टीला नकार देणारी व्यक्ती
  80. भगीरथ प्रयत्न - अतिशय पराकोटीचा प्रयत्न
  81. बावन कशी - सर्वोत्कृष्ट व्यक्ती किंवा वस्तू
  82. दुर्योधन हट्ट - दुराग्रही हट्ट
  83. बाळकडू - लहानपणापासून लागलेले वळण
  84. दीड शहाणा - अतिशय विचित्र सल्ला देणारा
  85. दुर्वास - शीघ्रकोपी मनुष्य
  86. बकासुर - खादाड व्यक्ती
  87. जरत्कारू - अशक्त माणूस
  88. गुळाचा गणपती - अतिशय मंद असणारा
  89. बिवलकरी किता - अक्षराचे नमुनेदार वळण
  90. जमदग्नी - सहज रागात येणारे व्यक्ती
  91. नंदीबैल - दुसऱ्याच्या किंवा बायकोच्या मर्जीने वागणारा व्यक्ती
  92. नरसिंह - उग्र व पराक्रमी मनुष्य
  93. पुतना - दिसायला प्रेमळ पण वास्तविक पाहता कुटील स्त्री 
  94. ताकापुरते रामायण - आपले काम साधून घेण्यासाठी केलेली खुशामत
  95. तुकाराम बुवा - भोळा किंवा भाविक माणूस
  96. जड भरत - आळशी किंवा सुस्त
  97. धन्वंतरी - कुशल वैद्य किंवा डॉक्टर
  98. आडवा वरचे पाणी - फार काळ न टिकणारे
  99.  नवकोट नारायण - संपत्ती लाभलेला मनुष्य
  100. परसातील भाजी - केव्हाही व सहज प्राप्त होणारी गोष्ट

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ