म्हणी व अर्थ | Marathi Mhani
म्हणी व अर्थ|Proverbs in Marathi
![]() |
| Marathi Mhani |
म्हणी व अर्थ | Marathi Mhani
मराठी म्हणी आपल्या बोली भाषेत अनेक सुंदर अर्थाच्या म्हणी आहेत. म्हणी या अतिशय सुंदर व अर्थपूर्ण असतात रोजच्या जिवनात जीवन जगत असताना येणार्या अनुभावातून कदाचित या म्हणी तयार झाल्या असाव्यात. म्हणी व अर्थ | Proverbs in Marathi
1. अति तिथे माती .
अर्थ-कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.
2. अंथरूण पाहून पाय पसरावे.
अर्थ-कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.
2. अंथरूण पाहून पाय पसरावे.
अर्थ- आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा.
3. आयत्या बिळावर नागोबा.
अर्थ- एखाद्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.
4. अति शहाणा त्याचा बैल रिकामा.
अर्थ- जो माणूस फार शहाणपणा करायला जातो, त्याच्या हातून काम बिघडते.
5. आगीतून फुफाट्यात.
अर्थ- लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे.
6. आलिया भोगासी असावे सादर.
अर्थ- जे नशिबात असेल, ते भोगायला तयार असावे.
7. आयत्या बिळात नागोबा.
अर्थ- दुसऱ्यांच्या कष्टावर स्वार्थ साधने.
8. आवळा देऊन कोहळा काढणे.
अर्थ- किरकोळ वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
9. अडला हरी गाढवाचे पाय धरी.
अर्थ- शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते.
10. आपला हात जगन्नाथ.
अर्थ- आपले काम करण्यासाठी स्वतः कष्ट करणे हेच योग्य ठरते. म्हणी व अर्थ| "Marathi Mhani"
11. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन.
अर्थ- किमान लाभाची अपेक्षा केली असताना, अपेक्षेपेक्षा काहीतरी अधिक लाभ होणे.
12. इकडे आड, तिकडे विहीर.
अर्थ- दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे.
13. एक ना धड, भाराभर चिंध्या.
अर्थ- एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे.
14. उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग.
अर्थ- उतावळेपणाने मुर्खासारखे वर्तन करणे.
15. एका हाताने टाळी वाजत नाही.
अर्थ- कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूकडील माणसे जबाबदार असतात.
16. उथळ पाण्याला खळखळाट फार.
अर्थ- ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात, तो मनुष्य फार बढाई मारतो.
17. ऐकावे जनाचे करावे मनाचे.
अर्थ- कोणत्याही कामाबाबत दुसऱ्याचे मत घ्यावे परंतु शेवटी आपल्याला जे योग्य वाटेल ते विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे.
18. करावे तसे भरावे.
अर्थ- दुष्कृत करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच.
19. कामापुरता मामा.
अर्थ- गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस.
20. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.
अर्थ- एखादे भयंकर संकट येऊन त्यातून सही सलामत सुटका होणे
21. आईचे माया अन, पोर जाईल वाया
अर्थ- अति लाड केले तर मुले बिघडतात.
22. काखेत कळसा, गावाला वळसा.
अर्थ- हरवली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे.
23. काळाला होता, पण वेळ आली नव्हती.
अर्थ- एखादे घर संकट येऊ नाही त्यातून सही सलामत सुटणे.
24. खान तशी माती.
अर्थ- आई-वडिलांप्रमाणे मुलाची वर्तणूक असणे.
25. खायला काळ, भुईला भार.
अर्थ- निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो.
26. गरजवंतांना अक्कल नसते.
अर्थ- गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्ट सुद्धा मान्य करावे लागते.
27. गरज सरो, वैद्य मरो
अर्थ- आपले काम संपतात उपकार कर्त्याला विसरले.
28. गाढवाला गुळाची चव काय?
अर्थ- अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही.
29. गुरुची विद्या गुरुला फळली.
अर्थ- एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.
30. गोगलगाय नि पोटात पाय
अर्थ- एखाद्याचा खरे स्वरूप न दिसणे.
31. घरोघरी मातीच्या चुली.
अर्थ- सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.
32. चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे
अर्थ- प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच.
33. चोराच्या मनात चांदणे.
अर्थ- आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटत राहणे.
34. चोर सोडून संन्याशाला सुळी देणे.
अर्थ- अपराध्याला सोडून निरप्राध्याला शिक्षा देणे.
35. चोरावर मोर.
अर्थ- एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे.
36. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
अर्थ- मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही.
37. ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी
अर्थ- ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे.
38. झाकली मूठ सव्वा लाखाची
अर्थ- मौन पाळून अब्रू राखणे.
39. डोंगर पोखरून उंदीर काढणे.
अर्थ- अतोनात परिश्रम मेहनत करूनही अत्यल्प फायदा होणे
40. तळे राखी, तो पाणी चाखी
अर्थ- एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपभोग घेणारच.
41. तहान लागल्यावर विहीर खणणे.
अर्थ- एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे
42. ताकापुरती आजी.
अर्थ- स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याची गुणदान करणे
43. दगडापेक्षा वीट मऊ.
अर्थ- मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे.
44. थेंबे थेंबे तळे साचे.
अर्थ- थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो
45. दाम करी काम.
अर्थ- पैशाने सर्व कामे साध्य होणे.
46. दुरून डोंगर साजरे.
अर्थ- कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते
49. देश तसा वेश
अर्थ- परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे.
50. दिव्याखाली अंधार.
अर्थ- मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच
51. देव तारी त्याला कोण मारी?
अर्थ- देवाची कृपा असल्यावर आपले कुणीही वाईट करू शकत नाही अशी भावना
53. दोघांचे भांडण तिसऱ्याला लाभ.
अर्थ- भांडण करणाऱ्याचा काहीही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचा फायदा होणे.
54. नव्याचे नऊ दिवस.
अर्थ- एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोड कौतुक केले जाणे.
55. नाव मोठे, लक्षण खोटे.
अर्थ भपका मोठा पण वस्तू स्थिती नेमकी विरुद्ध असणे.
56. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.
अर्थ- केलेल्या उपदेशाचा काहीही उपयोग न होणे.
57. नाचता येईना अंगण वाकडे.
अर्थ- आपल्यातील कोणीपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.
58. नाकापेक्षा मोती जड.
अर्थ- कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठाहून वर चढ होणे; आपल्या सोयीसाठी केलेली गोष्टच आपणास तापदायक
59. नावडतीचे मीठ अळणी.
अर्थ- नावडत्या माणसाने केलेले चांगले काम देखील वाईट दिसते.
60. पळसाला पाने तीनच
अर्थ- कुठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे.
61. पालथ्या घागरीवर पाणी.
अर्थ- केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे
62. प्रयत्नांती परमेश्वर.
अर्थ- कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते.
63. पाचही बोटे सारखी नसतात.
अर्थ- सर्व माणसे सारख्याच स्वभावाची व योग्यतेची नसतात.
64. पी हळद मी हो गोरी
अर्थ- कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे.
65. बळी तो कान पिळी
अर्थ- बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो.
66. पदरी पडले पवित्र झाले.
अर्थ- कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की त्यातील दोषांकडे दुर्लक्ष करून समाधान मानणे.
67. बैल गेला नि झोपा केला.
अर्थ- एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते
68. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.
अर्थ- एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.
69. मनी वसे ते स्वप्नी दिसे.
अर्थ- जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडणे.
70. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
अर्थ- एखाद्याच्या भावी कर्तबघारीचा अंदाज त्याच्या बालपणीच बांधता येतो
80 लहान तोंडी मोठा घास
अर्थ- आपल्या योग्य तेस न शोभेल असे वर्तन करणे
81. वासरात लंगडी गाय शहाणी
अर्थ- अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते.
82. रात्र थोडी संगे फार.
अर्थ- कामे पुष्कळ पण ती पार पडायला वेळ न पुरणे.
83. लेकी बोले, सुने लागे.
अर्थ- एकाला उद्देशून; पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.
84. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली
अर्थ- एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तम, नाही तर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे
85. कोल्हा काकडीला राजी.
अर्थ- सामान्य कुवतीची माणसे शूद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात
86. भित्या पाटी ब्रह्म राक्षस.
अर्थ- भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात.
87. बोलायचाच भात आणि बोलायचीच कडी.
अर्थ- प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे.
88. भरवशाच्या म्हशीला टोणगा.
अर्थ- ज्याच्याकडून खात्रीने अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षा भंग होणे.
89. शितावरून भाताची परीक्षा.
अर्थ- एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे
90. शेंडी तुटो की पारंबी तुटो.
अर्थ- दृढ निश्चय करणे.
91. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही.
अर्थ- माणुस कितीही संकटाला तर सापडला तरी आपला स्वभाव सोडत नाही
92. हसतील त्याचे दात दिसतील
अर्थ - चांगली गोष्ट करताना निंदा करणाऱ्याची किंवा टिंगल करणाऱ्याची परवा न करणे.
93. सरड्याची धाव कुंपणापर्यंत.
अर्थ- सामान्य कुवतीच्या माणसाची झेप विशिष्ट मर्यादितच असते.
94. शेरास सव्वाशेर.
अर्थ- समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे.
96. हजीर तो वजीर
अर्थ- जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल.
97. हत्ती गेला आणि शेपूट राहिले
अर्थ -कार्याचा मोठा भाग पार पाडून थोडेसे कार्य शिल्लक राहणे.
98. हाताच्या काकणाला आरसा कशाला?
अर्थ- प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते.
99. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.
अर्थ- दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे
100. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे.
अर्थ -जे खात्रीपूर्वक सहज मिळण्यासारखे आहे ते सोडून ज्याच्या मिळण्याबद्दल खात्री नाही ते मिळण्याचा प्रयत्न करणे.
लेबल: MarathiGrammar


0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ